भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील मातृभूमी चौकातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची सोन्याची पोत लांबल्याची घटना घडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, उषा श्रीकृष्ण चाटे (वय २५, धंदा गृहिणी रा. पोलीस वसाहत भुसावळ) यांनी बाजार पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या दि. ६ सप्टेंबर रोजी ५ वाजेच्या सुमारास शहरातील मातृभूमी चौकात एका बेन्टेक्स ज्वेलरीच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. बेन्टेक्स ज्वेलरी खरेदी करत असतांना तेथे जमलेल्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने सौ. चाटे यांच्या गळ्यातील १७ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना शशिकांत तायडे हे करीत आहेत.