• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पु.ना. गाडगीळ यांच्या कलादालनात ६३ व्या कलाप्रदर्शनीची दिमाखदार सुरवात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 5, 2022
in क्रिंडा, जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0

चित्रकार दुर्गा तायडे यांच्या डॉट असलेले चित्र ठरले आकर्षक

जळगाव येथील प्रतिष्ठीत पु.ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात गुरुवार १ सप्टेबर २०२२ पासून ६३ व्या १५ दिवसीय कलाप्रदर्शनीची दिमाखदार सुरवात करण्यात आली. या कलाप्रदर्शनीने कला जगतात रमणाऱ्या सर्व कलाप्रेमीं मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष बाब म्हणजे चित्रकार दुर्गा तायडे यांनी अजिंठा लेणीवर काढलेले चित्र आकर्षण ठरले आहे.

या कलाप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ चित्रकार सतीश वर्मा, प्राचार्य रागिणी कला एवं संगीत महाविद्यालय, बुऱ्हाणपूर, श्री. अतुल मालखेडे प्राचार्य सप्तपुत ललितकला भवन, खिरोदा, मिलन भामरे, विभाग प्रमुख फाईन आर्ट डिपार्टमेंट मू.जे. महाविद्यालय, जळगाव, तसेच संदीप पोतदार, व्यवस्थापक पु.ना. गाडगीळ आणि सन्स, जळगाव या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून १५ दिवसीय प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत, सर्व सहभागी विद्यार्थी चित्रकाराचे उत्साह वाढवला व कौतुकाची थाप आपल्या शब्दांतून देऊन या विद्यार्थी चित्रकारांना प्रोत्साहन दिले. भविष्यात असेच प्रदर्शनीचे आयोजन होत रहावे आणि जास्तीत जास्त संख्येने युवा चित्रकार घडत रहावे अशी सदिच्छा व्यक्त केली तसेच समस्त जळगावकर आणि कलाप्रेमींसाठी हे कलाप्रदर्शन १५ सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे तरी जास्तीतजास्त संख्येने या प्रदर्शनीला भेट देऊन कालाकरांचे उत्साहवर्धन करावे असे आवाहन देखील मान्यवरांनी केले आहे.

या कलाप्रदर्शनीमधे युवा विद्यार्थी चित्रकार योगिता अत्तरदे, अमोल पाटील, दिपाली चिखलीकर, आरती रायपुरे, दुर्गा तायडे आणि निलम मित्तल यांनी एब्स्ट्राक्ट, ल्यान्डस्कॅप, क्रियेटीव कॉम्पोझीशन, अजंता सिरीज व मिनीयेचर पेटींग्स अशा विविध चित्रशैलींद्वारे कलाप्रेमींची तृष्णा शमवून त्यांच्या वैचारिक सृजनशीलतेला चालना मिळत आहे.

दरम्यान, दुर्गा तायडे या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवाशी आहे. त्यांनी या ठिकाणी अजिंठा लेणीवर चित्र काढलेले आहे. यासाठी त्यांनी इंक, पेन व वाटर कलरचा वार केलेा आहे. विशेष म्हणजे त्यांनी काढलेले चित्र हे डॉट मध्ये केलेले असून याच अधिक कौतूक केले जात आहे. यासाठी त्यांना त्यांची आई प्रेरणा बनली आहे असे चित्रकार दुर्गा तायडे यांनी सांगितले आहे.

Previous Post

गणोशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीत झालेल्या लाठीमारचा निषेध; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

शिक्षक हा देशाचा आधार आहे, तो मार्गदर्शक आहेत-मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

शिक्षक हा देशाचा आधार आहे, तो मार्गदर्शक आहेत-मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group