जळगाव ;- राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी दिनांक 2 जुलै, 2021 अन्वये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 1 ऑगस्ट, 2021 पर्यंत देण्यात आलेली होती.
तथापि, राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.