भुसावळ : प्रतिनिधी
बायोकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन जणांच्या बँक खात्यावर तब्बल १६ लाख रूपये टाकूनही ऑइल दिले नाही आणि पैसे परत देण्यासही टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झालेल्या व्यक्तीने सूरत येथील दोन जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
येथील हॉटेल व्यावसायिक सारंगधर महादेव पाटील उर्फ छाेटू ढाबेवाले यांना बायाेकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करायचा हाेता. यासाठी त्यांनी सूरत येथून अालेल्या कंपनीच्या हिरेन ताेमर व राकेश (पूर्ण नाव माहिती नाही) दाेन एजंटसोबत चर्चा केली. दाेघांना २० लाख रुपयांच्या ऑइलची अाॅर्डर दिली. त्यापैकी १६ लाख रूपये ३ डिसेंबर २०२१ रोजी दोघांच्या बँक खात्यावर टाकले. यानंतर पाटील यांनी हिरेन व राकेशकडे वारंवार ऑइलची मागणी केली. मात्र, गाडी निघाली अाहे, गाडी खराब झाली अाहे, उद्या माल पाठवतो असे उत्तरे देऊन टाळाटाळ झाली. शेवटी पाटील यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, त्याचा उपयोग न झाल्याने व दोघांनी कराराचा भंग केल्याने सारंगधर पाटील यांनी शनिवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर हिरेन ताेमर व राकेश यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार गाेपाळ गव्हाळे हे करत अाहे.