Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पवन सोनवणेला ७ वर्षांची शिक्षा!
    क्राईम

    बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पवन सोनवणेला ७ वर्षांची शिक्षा!

    editor deskBy editor deskOctober 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पीडित अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे मोबाईल व्हॉईस क्लीप व इंटरनेट व व्हॉटसअपवर व्हायरल करुन बदनामी करेल, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर संशयिताने गावाच्या बाहेर गिरणा नदीपात्रात वाळुवर लैगिंक अत्याचार केले. या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या चौकशीअंती जिल्हा सत्र न्यायालयाने पवन सोनवणे (वय १९) याला दोषी धरत सात वर्ष सश्रम कारावास तसेच २० हजार दंड अशी शिक्षा सुनावली. ही घटना १८ जुलै २०१९ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना जळगाव तालुक्यात घडली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार या प्रकरणी जळगांव तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    तपासी अधिकारी गणेश चव्हाण यांनी या गुन्हयाचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याची चौकशीचे कामकाज अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. बनकर यांच्या न्यायालयात चालले. खटल्याच्या कामी सरकारपक्षातर्फे एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पीडित, फिर्यादीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता राजेंद्र बोरसे यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी सरकारपक्षास सहकार्य केले. सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांचा प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीला पोस्को कायदा कलम ३ व ४ अन्वये आरोपीला सात वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा तसच २० हजार रुपये दंड सुनावला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मकरा फटाक्यांसमोर मृत्यूचा थरार : डंपर-ट्रकची भीषण धडक; एकाचा बळी, दुसरा गंभीर जखमी!

    October 30, 2026

    उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार ? शिंदेंच्या नेत्याचे मोठे विधान !

    October 30, 2026

    . डंपर मागे घेताना भीषण अपघात; रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा जागीच जीव गेला!

    October 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.