Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाचोरा-वरखेडी मार्गावर मृत्यूचा सापळा : ट्रक उलटून हमालाचा बळी !
    क्राईम

    पाचोरा-वरखेडी मार्गावर मृत्यूचा सापळा : ट्रक उलटून हमालाचा बळी !

    editor deskBy editor deskOctober 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी 

    शहरातून भोजे येथे रेशनचे धान्य घेवून जाणारा ट्रक अचानक उलटला. या दुर्दैवी अपघातात ट्रकच्या मागे पोत्यांवर बसलेल्या हमालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा येथून वरखेडी मार्गे भोजे येथे रेशनिंगचे धान्य घेवून जाणारा आयशर ट्रक (एमएच १९, १९४७) हा वळणावरील कठडे नसलेल्या नाल्यात उलटल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजता घडली. या वेळी ट्रकमध्ये चालकासह तीन हमाल बसलेले होते. तर हमाल गहू आणि तांदुळाच्या कद्वयांवर बसलेले होते. या पैकी संभाजी केरप्पा बावचे (रा. गिरणा पंपिंग रोड, गोकुळधाम समोर, पाचोरा) यांचा गव्हाच्या गोण्यांखाली दबले गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रत्यक्ष दर्शीच्या माहितीनुसार समोरून येणाऱ्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात हा आयशर ट्रक ऊलटल्याचे कळते.

    अपघातातील मयत संभाजी बाचवे यांचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या संदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, दुपारी वरखेडीतील गुरुवारचा आठवडे बाजार असल्याने बाजारात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अपघाताची माहिती मिळताच वरखेडी बीटचे पो.कॉ. नामदेव इंगळे व अतुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर !

    October 23, 2026

    शनिपेठ पोलीस ठाण्यात मोठा बदल : डॉ. जयस्वाल यांची बदली, सागर शिंपींकडे अतिरिक्त जबाबदारी !

    October 23, 2026

    बनावट ओळखपत्रावर १५.८५ लाखांची थार खरेदी; चौघांविरुद्ध गुन्हा!

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.