Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात मध्यरात्री चाकूहल्ल्याचा थरार : मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तिघांवर हल्ला !
    क्राईम

    जळगावात मध्यरात्री चाकूहल्ल्याचा थरार : मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तिघांवर हल्ला !

    editor deskBy editor deskOctober 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २१ ऑक्टोंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास वाघ नगरातील दत्त मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राजीव गांधी नगरात राहणारा निखील लक्ष्मण हातागळे (वय २४) हा तरुण त्याचा मित्र तेजस लोंढे व गिरीश लोंढे यांच्यासोबत दि. २१ ऑक्टोंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरात त्याच्या मित्राने भांडण सोडविण्यसाठी गेला होता. यावेळी तिघांनी त्याला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी रोहीत नाथ याने तेजस लोंढे यांच्या मांडीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. तर शुभम ठाकुर याने पुन्हा गल्लीत दिसले तर तुम्हाला जीवंत मारुन टाकू अशी धमकी देखील दिली. दरम्यान, जखमींनी दिलेल्या तक्रारीवरुन शुभम उर्फ पेट्या ठाकूर, रोहीत नाथ व पियुष इंगळे (सर्व रा. वाघनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अविनाश देवरे हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर !

    October 23, 2026

    पाचोरा-वरखेडी मार्गावर मृत्यूचा सापळा : ट्रक उलटून हमालाचा बळी !

    October 23, 2026

    शनिपेठ पोलीस ठाण्यात मोठा बदल : डॉ. जयस्वाल यांची बदली, सागर शिंपींकडे अतिरिक्त जबाबदारी !

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.