Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमसंबंधाच्या विरोधाचा वाद जीवावर बेतला : धमक्यांच्या त्रासातून २८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    प्रेमसंबंधाच्या विरोधाचा वाद जीवावर बेतला : धमक्यांच्या त्रासातून २८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskOctober 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    प्रेमसंबंधाला विरोध केल्याने वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याच्या आरोपातून २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील देवळवाडा परिसरात घडली. प्रशांत संजय सोनवणे (वय २८, रा. देऊळवाडा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सोनवणे याची मावस बहीण रोशनी अशोक ठाकरे हिचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रेमसंबंधाला प्रशांतचा विरोध होता. याच कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    तक्रारीनुसार, प्रशांतला रस्त्यात अडवून तसेच विविध ठिकाणी त्रास देण्यात येत होता. या सततच्या त्रासामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रशांतने आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

    या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

    October 6, 2026

    चिमुकला शाळेतून घरी आला अन्‌ वडिलांना गमावून बसला !

    October 6, 2026

    ढापा नसलेल्या गटारीत दुचाकी कोसळली; ३७ वर्षीय नवल सोनवणेंचा दुर्दैवी मृत्यू!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.