Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ढापा नसलेल्या गटारीत दुचाकी कोसळली; ३७ वर्षीय नवल सोनवणेंचा दुर्दैवी मृत्यू!
    क्राईम

    ढापा नसलेल्या गटारीत दुचाकी कोसळली; ३७ वर्षीय नवल सोनवणेंचा दुर्दैवी मृत्यू!

    editor deskBy editor deskOctober 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकी पडून नवल अर्जुन सोनवणे (वय ३७, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा संतापजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे नवल सोनवणे हे मेहरूण भागातील आपले काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात सध्या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच रस्त्यावरून पुढे जात असताना नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले होते. या गटारीवर ढापा टाकण्यात आलेला नव्हता. दुचाकीवरून पुढे जात असताना नवल यांना रस्त्यावरील या उघड्या गटारीचा अंदाज आला नाही. अचानक गटार आल्याने त्यांची दुचाकी थेट गटारीच्या ब्लॉकमध्ये जाऊन अडकली. या भीषण अपघातात नवल थेट डोक्यावर आदळले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    रस्त्याचे आणि गटारीचे काम सुरू असताना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती उघड्या गटारीभोवती कोणतेही संरक्षण किंवा धोक्याची सूचना देणारा कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता. जर या गटारीवर सुरक्षेसाठी कल्व्हर्ट टाकले असते किंवा किमान सूचना फलक लावला असता, तर नवल यांचा जीव वाचला असता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    नवल सोनवणे हे एमआयडीसी भागातील एका चटई कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, नवल यांच्या वडिलांचे गेल्या वर्षीच निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी नवल यांच्यावरच होती. त्यांच्या अचानक जाण्याने सोनवणे कुटुंबाचा एकमेव आधार हरपला असून, त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

    या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. संबंधित कामाचा मक्तेदार जबाबदार असून, त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवल यांच्या संतप्त नातेवाईकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चिमुकला शाळेतून घरी आला अन्‌ वडिलांना गमावून बसला !

    October 6, 2026

    मैत्रीच्या नावाखाली मानसिक छळ : विद्यार्थिनीचा पाठलाग; धमकी अन्‌ दबावामुळे अखेर पोलिसांत धाव !

    October 6, 2026

    बस पकडताना काळाचा घाला : पाळधीत दहावीच्या विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.