Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तीन राउंड फायरिंग; २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी !
    क्राईम

    कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तीन राउंड फायरिंग; २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskNovember 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    कजगाव-पारोळा रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या तीन राउंड फायरिंगमध्ये जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २२, रा. कजगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. यातील एक गोळी त्याच्या डोक्यात लागल्याची प्राथमिक माहिती असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जयेश पवार हा कजगाव-पारोळा रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पावर कामासाठी जात होता. याचदरम्यान प्रकल्पाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या तीन राउंड फायरिंगमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. गोळी डोक्यात लागल्याने जयेश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला आणि या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. कामावर जात असतानाच तरुणावर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण कामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणावर सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

    कजगाव-पारोळा रोडवरील या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोळीबाराची घटना नेमकी कशामुळे घडली, हल्लेखोरांची संख्या किती होती आणि त्यांचा उद्देश काय होता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास सुरू असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून गोळीबारामागील सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कजगावसह भडगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या कुटुंबाला कालव्यात फेकल्याचा आरोप; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता!

    November 25, 2026

    ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई !

    November 24, 2026

    जिल्हा बँकेच्या रणांगणातून राजकीय संघर्षाला नवे वळण!

    November 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.