Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » श्री विसर्जनाच्या दिवशी भुसावळ हादरले : किरकोळ वादातून तरुणाचा गळा आवळून खून !
    क्राईम

    श्री विसर्जनाच्या दिवशी भुसावळ हादरले : किरकोळ वादातून तरुणाचा गळा आवळून खून !

    editor deskBy editor deskSeptember 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    श्री विसर्जनाच्या जल्लोषात शहर दुमदुमत असतानाच भुसावळात एका तरुणाच्या खुनाने काळीज हादरवणारी घटना समोर आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाला पंधरवडा पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा एका तरुणाचा गळा आवळून मृत्यू झाल्याने शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या नगरपालिकेच्या विहिरीसमोरील खोलीत शुक्रवारी रात्री हा थरार घडला. राहुल सदाशिव धांडे (३५, रा. कवठा, ता. अकोट, जि. अकोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पवन अनिल सोनवणे (३०, रा. वरणगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्राथमिक माहितीनुसार दोघे मित्र असल्याचे समोर आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, श्री विसर्जनाच्या दिवशी सायंकाळपासून राहुल आणि पवन हे दोघे एकत्र होते. रात्री जुन्या नगरपालिकेतील विहिरीसमोरील एका खोलीत दोघे बसले असताना शिवीगाळ करण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्राथमिक माहितीनुसार, संतापाच्या भरात पवनने राहुलला जमिनीवर आपटले. त्यानंतर रुमालाने गळा आवळल्याने राहुलचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

    घटनेनंतर पवन घटनास्थळावरून निघून वरणगावला गेल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यानंतर त्याने स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावली. राहुलचा आपटून व गळा आवळून खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. वरणगाव पोलिसांनी तत्काळ भुसावळ बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला असून, या प्रकरणातील नेमका घटनाक्रम, खुनामागील कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

    भुसावळ शहरात खुनाची ही घटना काही पहिलीच नाही. १० सप्टेंबर रोजी पाटीलमळा परिसरात रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे (३६) यांची चॉपरने वार करून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्या घटनेची धग कायम असतानाच आता पुन्हा एका तरुणाचा गळा आवळून मृत्यू झाल्याने शहरातील गुन्हेगारी घटनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे श्री विसर्जनासारख्या मोठ्या बंदोबस्ताच्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. सण-उत्सवाच्या गर्दीत जल्लोष सुरू असताना शहराच्या एका कोपऱ्यात तरुणाचा जीव गेला; त्यामुळे भुसावळातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा आणखी किती कठोर पावले उचलणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू!

    September 27, 2026

    धरणगाव : अल्पवयीन मुलगी गर्भवती; ४३ वर्षीय आरोपी अटकेत !

    September 27, 2026

    किरकोळ वादाचे भयंकर रूप; भरधाव कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

    September 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.