Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रक्षाबंधनानंतर भाऊबीजेलाही जपला मायेचा धागा; बहिणींना दिली प्रेमाची भेट
    सामाजिक

    रक्षाबंधनानंतर भाऊबीजेलाही जपला मायेचा धागा; बहिणींना दिली प्रेमाची भेट

    editor deskBy editor deskNovember 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रक्षाबंधनानंतर भाऊबीजेलाही जपला मायेचा धागा; बहिणींना दिली प्रेमाची भेट

    चोपडा/जळगाव (प्रतिनिधी) : कितीही मोठे पद मिळाले, कितीही जबाबदाऱ्या वाढल्या, तरी बहिणीच्या मायेपुढे भाऊ हा नेहमीच भाऊ असतो. या अतूट नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या भाऊबीज साजरी करण्याच्या निमित्ताने आला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत त्यांनी चोपडा येथील आपल्या दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. बहिणींच्या प्रेमाचा स्वीकार करत त्यांना भाऊबीजेची प्रेमळ भेट दिली आणि बहीण-भावाच्या जिव्हाळ्याच्या नात्याची परंपरा जपली.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तीन बहिणी असून, त्यापैकी सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर या दोघी चोपडा येथे वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनाच्या सणालाही गुलाबभाऊंनी दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली होती. आता भाऊबीजेलाही आवर्जून त्यांच्या घरी भेट देत त्यांनी बहिणींवरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली. राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यापातही कौटुंबिक नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या गुलाबभाऊंच्या या भेटीने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    सार्वजनिक जीवनात हजारो कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे गुलाबभाऊ आपल्या बहिणींसाठी मात्र आजही तेच प्रेमळ आणि मायेचे भाऊ आहेत. पद, प्रतिष्ठा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन रक्ताची नाती जपण्याचा त्यांचा स्वभाव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. रक्षाबंधन असो की भाऊबीज, बहिणींच्या सुख-दुःखात कायम पाठीशी उभे राहण्याची भावनिक बांधिलकी त्यांच्या या भेटीतून व्यक्त झाली.

    यांची होती उपस्थिती
    यावेळी नगरसेवक आबा पदेशमुख, भैया पवार राजाराम पाटील अशोक पाटील आणि भरत देशमुख, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सतेज पाटील गटाला धक्का : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील !

    November 11, 2026

    सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

    November 10, 2026

    काळ्या आईची तहान भागणार! गिरणा, वाघूर अन् अंजनी नदीला पाण्याचे आवर्तन; बळीराजासाठी दिलासादायक निर्णय!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.