Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; तिन्ही आरोपींची पोलिसांनी काढली धिंड!
    क्राईम

    तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; तिन्ही आरोपींची पोलिसांनी काढली धिंड!

    editor deskBy editor deskSeptember 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जुन्या वादातून शिवीगाळ करीत आलेल्या तिघांनी क्षितीज उर्फ सिद्धू मनोज निधाने (वय २०, रा. गुरुनानक नगर) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना दि. १२ रोजी दुपारी घडली होती. या प्रकरणातील फरार संशयित राहुल अशोक शिंदे, विजय जयवंत शिंदे व लखन सुनिल कोळी (सर्व रा. चौघुले प्लॉट, कांचननगर) या तिघांची घटनास्थळी नेवून पंचनामा करण्यात आला. तसेच त्यांची दहशत मोडण्याकरीता परिसरातून पायी धींड काढण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरात क्षितीज उर्फ सिद्धू निधाने हा तरुण वास्तव्यास असून त्याचा मनोज शिंदे, विजय शिंदे यांच्यामध्ये आपसात वाद आहे. क्षितीज उर्फ सिद्ध निधाने हा त्याचा मित्र बाबू ढबलपुरे व लकी कुरील यांच्यासोबत भीलपुरा पोलीस चौकीपासून गुरुनानक नगरकडे पायी जात होते. यावेळी मायक्का देवी मंदिराजवळ असतांना राहुल शिंदे, विजय शिंदे व लखन नामक व्यक्ती हे त्याठिकाणी आले. त्यातील संशयित राहुल शिंदे याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने क्षितीज निधाने याला ठार मारण्याच्या उद्देशाने मानेवर, छातीवर, पोटावर चार ते पाच वार केले. त्यानंतर ते तिघ तेथून दुचाकीने पसार झाले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तात्काळ छत्रपती संभाजी नगर येथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी संशयित राहुल शिंदे, विजय शिंदे व लखन (पुर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. चौघुले प्लॉट, कांचननगर) यांना अटक करण्यात आली आहे.

    पोलीस कोठडीत असलेल्या हल्लेखोरांना क्युआरटी पथकाच्या कडेकोट बंदोबस्तात भिलपुरा चौकातून पायी घटनास्थळी नेण्यात आले. तसेच घटनास्थळी घडलेल्या घटनेचा क्राईमसीन तयार करुन पंचनामा करण्यात आला. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महिलेचा विनयभंग अन् जाब विचारणाऱ्याला मारहाण; अपमानित सासऱ्याने घेतले विष!

    September 17, 2026

    भुसावळ हादरले : बेपत्ता ६ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला लिफ्टच्या खड्ड्यात !

    September 17, 2026

    जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरीचा पर्दाफाश : स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात संशयित !

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.