Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक !
    जळगाव

    मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक !

    editor deskBy editor deskSeptember 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या श्री गणपतीची भव्य आगमन मिरवणूक सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता शिवतीर्थ मैदानापासून अत्यंत उत्साहपूर्ण आणि डीजेमुक्त वातावरणात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीची सुरुवात शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे आणि अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून झाली.

    शिवतीर्थ मैदानापासून निघालेली ही मिरवणूक महानगरपालिकेच्या प्रांगणापर्यंत वाजत-गाजत पोहोचली. मिरवणुकीत आमदार, महापौरांसह सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. ढोल-ताशांच्या तालावर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धरलेला ठेका आणि जल्लोष शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.

    महानगरपालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात मिरवणुकीचा निरोप घेऊन श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. महापौर दीपमाला काळे आणि माजी नगरसेवक मनोज काळे या दांपत्याच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महाआरती पार पडली.

    या सोहळ्याला उपायुक्त धनश्री शिंदे, शिवसेनेचे गटनेते तथा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना (ठाकरे गट) गटनेत्या अर्शीनबानो शोएब खाटीक, भाजप उपगटनेते नितीन बरडे, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे पाटील, उज्वलाताई बेंडाळे, ॲड. शुचिता हाडा, नगरसेवक सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, विशाल भोळे, महिला व बालकल्याण समिती सदस्य गायत्री राणे, सुरेखा तायडे, विद्या सोनवणे यांच्यासह वैशाली पाटील, पियुष कोल्हे, अमर जैन, विजय बांदल, कल्पेश सोनवणे, नितीन सपके, वंदना इंगळे, मानसी भोईटे, डॉ. नरेंद्र पाटील, अंकिता पाटील, जयश्री पाटील, अनिता भापसे, आशा पाटील, रबियाबी अमजद खान, नलुबाई सोनवणे, अनिल अडकमोल, रिटा सपकाळे, निलेश तायडे, प्रवीण कोल्हे, कविता पाटील, रितिक ढेकळे, अक्षय वंजारी, स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी, प्रदीप रोटे, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ​केन्द्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना !

    September 14, 2026

    नवीन बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेच्या बॅगेतून ९० हजारांचे दागिने गायब

    September 14, 2026

    धरणगावमार्गे उधना-पुणे नवीन रेल्वे लवकरच; खान्देशातील रेल्वे प्रश्नांवर ZRUCC बैठकीत चर्चा

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.