Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
    जळगाव

    रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 7, 2026Updated:September 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : समाजसेवेच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव शहरातील रोटरीच्या भैय्यासाहेब नथमलजी लुंकड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी असिस्टंट गव्हर्नर ॲड. सागर चित्रे, माजी प्रांतपाल डॉ. सिकची, नाना शेवाळे, राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते रोहित आहुजा यांनी क्लबचे चार्टर प्रेसिडेंटपद स्वीकारले. तसेच धनराज कासट व पुनीत तरलेजा यांनी चार्टर सेक्रेटरीपदाची जबाबदारी स्वीकारली.

    चालू वर्षासाठी क्लबच्या Board of Directors (BoD) ची निवडही यावेळी करण्यात आली. यामध्ये ट्रेझरर सीए  सौरभ शाह, व्हाईस प्रेसिडेंट सरिता झावर, तसेच पूनम वर्मा, योगेश सांखला, निकुंज अग्रवाल, विनीत आहुजा, दर्शन जैन, पराग बेदमुथा, मयूर ओसवाल, तुषार भांबरे, प्रकाश मुळे आणि डॉ. महेंद्र मल्ल यांचा समावेश आहे.

    उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांना क्लबचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

    रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्लबची सदस्यसंख्या ६२ झाली आहे. यामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे. आगामी काळात जळगाव शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबवून समाजासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा मानस क्लबच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला.

    नवीन क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून गरजूंसाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चोपड्यात मोहिणी डिजे बॅन्डचा मालकावर गुन्हा दाखल !

    September 7, 2026

    ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या टोळीचा पर्दाफाश!

    September 7, 2026

    जाळी तोडून कंपनीत प्रवेश, ५०० किलो शिशाच्या विटांवर डल्ला; सहा आरोपी जेरबंद

    September 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.