Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या टोळीचा पर्दाफाश!
    क्राईम

    ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या टोळीचा पर्दाफाश!

    editor deskBy editor deskSeptember 7, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पारोळा तालुक्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या ईको वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातू असलेले कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पारोळा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी निळ्या रंगाची मारुती वॅगनार, ईको वाहनांचे तीन सायलेंसर, कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंचे तुकडे तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा अंदाजे मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावाजवळ करण्यात आली.

    पारोळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करणाऱ्या संशयितांबाबत माहिती मिळाली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस अधीक्षक जळगाव श्रीकांत धिवरे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर विभाग विनायक बाजीराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    पोलिसांनी नाकाबंदी केली असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास DL-3-CBU-3358 क्रमांकाची निळ्या रंगाची मारुती वॅगनार संशयास्पदरीत्या येताना दिसली. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम आढळून आले. वाहनाच्या मागील बाजूस जुने व खराब कपडे रचलेले दिसत होते. वाहनातील वस्तूंबाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी चालक व त्याच्या साथीदाराची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे यासिफ यामीन चौधरी (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) अशी सांगितली.

    वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ईको वाहनांचे सायलेंसर काढण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी टॉमी, हातोडा, रिंच व इतर साहित्य आढळून आले. विशेष म्हणजे वाहनाच्या सीटखाली तीन जुने ईको वाहनांचे सायलेंसर पोलिसांना मिळून आले. याशिवाय वाहनातील मोठ्या थैलीत १० पांढऱ्या कॅरीबॅग आढळून आल्या. या कॅरीबॅगमध्ये ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये असलेल्या प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम या मौल्यवान धातूंचे तुकडे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

    पोलिसांनी दोन्ही संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये असलेल्या मौल्यवान धातूंना बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने या धातूंच्या चोरीच्या उद्देशाने हे दोघे पारोळा तालुक्यात फिरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

    या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे— – ४ लाख रुपये अंदाजे किमतीची निळ्या रंगाची मारुती वॅगनार कार. – १ लाख ५० हजार रुपये अंदाजे किमतीचे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम धातूंचे तुकडे असलेल्या १० कॅरीबॅग. – ७५ हजार रुपये अंदाजे किमतीचे ईको वाहनांचे तीन जुने सायलेंसर. – १० हजार रुपये किमतीचा जुना Infinix मोबाईल. – लोखंडी टॉमी, हातोडा, रिंच व इतर चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य. असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा अंदाजे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

    दरम्यान, आरोपींनी यापूर्वी पारोळा तालुक्यासह अन्य ठिकाणी ईको वाहनांचे सायलेंसर अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी केले आहेत का, चोरीचा मुद्देमाल नेमका कुठे विकला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे तपासात या चोरीच्या रॅकेटबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

    सदर प्रकरणात पोको १४१४ आकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सपोनि अशोक पिंपळे करीत आहेत.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या आदेशाने सपोनि अशोक पिंपळे, डॉ. शरद पाटील, पोहेकॉ महेश पाटील, पोको अभिजीत पाटील, मिथुन पाटील, आकाश पाटील, तुषार सोनवणे तसेच महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोहिणी डिजे बॅन्डचा मालकावर गुन्हा दाखल !

    September 7, 2026

    जाळी तोडून कंपनीत प्रवेश, ५०० किलो शिशाच्या विटांवर डल्ला; सहा आरोपी जेरबंद

    September 7, 2026

    ३.७२ कोटींची फसवणूक अन् जागेचा परस्पर व्यवहार; साहित्या कुटुंबासह ७ जणांवर गुन्हा

    September 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.