Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला अपघात : स्टेअरिंगमध्ये बिघाड; चालक जखमी
    क्राईम

    तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला अपघात : स्टेअरिंगमध्ये बिघाड; चालक जखमी

    editor deskBy editor deskSeptember 7, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव  : प्रतिनिधी 

    पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाजवळ रविवारी (दि. ६) दुपारी तहसीलदारांचे शासकीय वाहन शासकीय कामानिमित्त जळगावकडून चाळीसगाव येत असताना अपघात झाला. वाहनाच्या स्टेअरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळी अपघाताच्या वाहनात केवळ चालक जावेद शेख हेच होते.

    या दुर्घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी श्रीराम केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभयांनी तत्काळ पाचोरा येथे धाव घेतली आणि जखमी चालकाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या अपघातात शासकीय वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेबाबत संबंधित प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत शेतात पाणी भरताना विजेचा जीवघेणा धक्का; कर्त्या तरुणाचा मृत्यू

    September 7, 2026

    एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने ट्रेलर घुसला अन् भीषण धडक! कॅबिनचा चुराडा, चालकांचे पाय अडकले

    September 7, 2026

    खेडीढोकमध्ये भरदिवसा घरफोडी! २.५७ लाखांचा ऐवज लंपास; परिसरात खळबळ

    September 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.