Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलाच्या दारूच्या व्यसनाने कुटुंब त्रस्त; अखेर आई-वडील अन् भावानेच घेतला जीव!
    क्राईम

    मुलाच्या दारूच्या व्यसनाने कुटुंब त्रस्त; अखेर आई-वडील अन् भावानेच घेतला जीव!

    editor deskBy editor deskSeptember 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ऑगस्ट महिन्यात मोहाडी (ता. जळगाव) येथे तरुणाच्या आत्महत्येच्या तपासात पोलिसानी धक्कादायक रहस्याचा उलगडा केला आहे. मुलगा दारु प्राशन करुन आई वडिलांना त्रास देत होता. या जाचाला कंटाळून त्याच्या आई वडिलांनी मुलाचा गळफास देत खून केला. तसेच दिशाभूल करण्यासाठी तरुणाने आत्महत्या केली, असा बनाव संशयितांनी केला होता, अशी खळबळजनक माहिती तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईवडिलांसह त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे.

    ३१ जुलैला दुपारी दीड वाजेच्या सुमारास राधेश्याम हरचंद राठोड (वय २६, रा. मोहाडी) या तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी सुरुवातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांचा संशय बळावला. तपासातून पोलिसांनी या घटनेचा सर्व बाबी अभ्यासत निर्णायक वळण दिले. तपासादरम्यान सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला. ही आत्महत्या नसून खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जन्मदात्या आई वडील आणि भावाने संगनमत करुन या तरुणाचा खून करत काटा काढला. तसेच घटनेला आत्महत्येचे स्वरुप देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा कट रचल्याचे सुत्रांनी सांगितले.

    ३१ जुलैच्या दुपारी संशयितानी आपापसात संगनमत केले. त्यानंतर राधेश्याम यास दोरीच्या सहाय्याने गळफास देत जागीच त्याची हत्या केली. यानंतर संशयितांनी गळफास दिलेली दोरी तात्काळ जाळुन टाकत हत्येचा मुख्य पुरावा नष्ट केला. यानंतर राधेश्याम याने स्वतःच आत्महत्या केली, असा बनाव करत संशयितांनी पोलिसांना खोटी माहिती दिली. तसेच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तथापि पोलिसांनी वेगवान तपासाचे चक्रे फिरवित संशयितानी केलेला खोटा कांगावा समोर आणला.

    घटनेचा संपूर्ण उलगडा झाल्यानंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करुन तिघे संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली. मीराबाई हरसिंग राठोड (मयताची आई), हरसिंग उर्फ हरचंद नथ्थु राठोड (मयताचे वडील), सचिन हरसिंग राठोड (मयताचा भाऊ) (सर्व रा. मोहाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिक्षिकेला अडवून लग्नाची मागणी : तरुणावर गुन्हा दाखल !

    September 5, 2026

    भडगावात संशयास्पद तांदळाची ट्रक पकडली; ३०० गोण्यांमुळे खळबळ!

    September 5, 2026

    हद्द कुणाची, वसुली कुणाची? आरटीओच्या ‘कलेक्शन’वरून नवा वाद!

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.