Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षिकेला अडवून लग्नाची मागणी : तरुणावर गुन्हा दाखल !
    अमळनेर

    शिक्षिकेला अडवून लग्नाची मागणी : तरुणावर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskSeptember 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    एका शिक्षिकेला अडवून माझ्याशी लग्न कर असे म्हणत जळोद येथील तरुणाने विनयभंग केल्याची घटना १ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावर घडली.

    या संदर्भात पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. १ रोजी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आपापल्या दुचाकीने मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंग समोरील रस्त्याने जात होते. या वेळी पीडित शिक्षिका ही एका सहकाऱ्यासोबत डबलसीट जात होत्या. या वेळी जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग हा दुचाकीने आला अन् त्याने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर खाली उतरून शिक्षिकेचा हात धरून तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणत त्यांचा विनयभंग केला. या संदर्भात पीडित शिक्षिकेने घरी जाऊन ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय न्यायसंहिता कलम ७४, १२६ (२) प्रमाणे हिराराल रायसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. गणेश पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुलाच्या दारूच्या व्यसनाने कुटुंब त्रस्त; अखेर आई-वडील अन् भावानेच घेतला जीव!

    September 5, 2026

    भडगावात संशयास्पद तांदळाची ट्रक पकडली; ३०० गोण्यांमुळे खळबळ!

    September 5, 2026

    हद्द कुणाची, वसुली कुणाची? आरटीओच्या ‘कलेक्शन’वरून नवा वाद!

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.