Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खाऊचे आमिष अन् चिकूच्या मळ्यात अत्याचाराचा आरोप; नशिराबादमध्ये खळबळ
    क्राईम

    खाऊचे आमिष अन् चिकूच्या मळ्यात अत्याचाराचा आरोप; नशिराबादमध्ये खळबळ

    editor deskBy editor deskSeptember 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    नशिराबाद परिसरातील एका मोठ्या प्रतिष्ठानच्या सुपरवायझरने एका चिकूच्या मळ्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. सुनील सावके (वय ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो नशिराबाद परिसरातील एका मोठ्या प्रतिष्ठानमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुनील सावके याने १३ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून एका चिकूच्या मळ्यात नेले. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलीच्या आईने तत्काळ नशिराबाद पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.

    गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नशिराबाद पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि संशयित सुनील सावके याला शोधून पॉक्सो कायद्यान्वये अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात नशिराबाद पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. योगिता नारखेडे यांच्या पथकातील पो.उ.नि. विजय कोळी, पोलीस कर्मचारी गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर भिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार, भूषण पाटील आदींनी केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.