
जळगाव : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एडिप (ADIP) योजनेतून तसेच खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रयत्नातून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिमको) यांच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांची तपासणी व मोजमाप करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी इंद्रा भवन, स्वामीनारायण मंदिरामागे, अमळनेर येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तपासणी शिबिर होणार आहे.
शिबिरासाठी यूडीआयडी कार्ड व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची मूळ व छायांकित प्रत, आधारकार्डची छायांकित प्रत, तलाठी/तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला आणणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास बीपीएल कार्ड अथवा पिवळ्या रेशन कार्डाची छायांकित प्रत सादर करावी.
तपासणी व मोजमापानंतर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२६ मध्ये सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सहाय्यक साहित्याची आवश्यकता असलेल्या दिव्यांग बांधवांनी शिबिरास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार श्रीमती स्मिता वाघ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



