Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साळशिंगी शिवारात खळबळ : झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह !
    क्राईम

    साळशिंगी शिवारात खळबळ : झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह !

    editor deskBy editor deskAugust 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

    मिळाळलेल्या माहितीनुसार, साळशिंगी शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था कुजलेली असल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

    घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिचयातील व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी तातडीने बोदवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.