Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सावदा पोलिसांचा गुटख्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’; १०.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
    क्राईम

    सावदा पोलिसांचा गुटख्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’; १०.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

    editor deskBy editor deskAugust 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील सावदा येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू व केशरयुक्त पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला सावदा पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ रंगेहात पकडले. या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पोलिसांना २७ रोजी रात्री १०.५० वाजता राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री ११.०४ वाजता संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. तसेच कारचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद ता. यावल) असे सांगितले. दोन पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला व तंबाखूची पाकिटे आढळली. पोलिसांनी ५ लाख २७हजार ७०० रुपयांचा पानमसाला व तंबाखू, तसेच ५ लाखांची होंडा अमेझ कार (एमएच- १९, सीव्ही-४४४५) असा एकूण १० लाख २७हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणल्याचे आरोपीने सांगितले असून या संदर्भात सारंग अवचार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश फड, पो.उ.नि. राहुल सानप, पो.हे.कॉ. नीलेश बाविस्कर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. तपास पो.उ.नि. राहुल सानप करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एरंडोलात खळबळ ; खडकेच्या पिता-पुत्रावर नर्मदेचे संकट; मुलाला वाचवताना वडिलांचाही बळी

    August 29, 2026

    बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस ठेवत भावाने घेतला टोकाचा निर्णय !

    August 29, 2026

    रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा!

    August 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.