Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : पोलिस ठाण्यात येवून तरुणाने ओतले अंगावर पेट्रोल !
    क्राईम

    खळबळजनक : पोलिस ठाण्यात येवून तरुणाने ओतले अंगावर पेट्रोल !

    editor deskBy editor deskAugust 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतनिधी 

    तालुक्यातील चिंचोली येथील पेट्रोल पंपावर तरूणांचा आपसात वाद झाला. त्यात एकास मारहाण तर एकास शिविगाळ करण्यात आली. डायल ११२ वर कॉल केल्याने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी संबधीत शिवीगाळ करणाऱ्यांना अटक का केली नाही. या रागातून एकाने पोलिस ठाण्यात येवून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दि. २४ रोजी घडली. याप्रकरणी तरूणाच्या तक्रारीवरून एका विरूध्द तसेच या तरूणाविरूध्द देखील अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार  चिचोली येथील पेट्रोल पंपावर समाधान धनगर व महेंद्र रूले हे दुचाकीवर गेले होते. तेथे त्यांच्याशी शुभम पाटील याने महेंद्र रूले यास मारहाण केली व समाधान धनगर यास शिवीगाळ केली आणि तुम्हाला बघुन घेईल, अशी धमकी दिली. तेव्हा समाधान धनगर याने डायल ११२ वर कॉल केला व पोलिसांची मदत मागितली. घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहचले असता तेथुन शुभम पाटील आणि महेंद्र रूले निघुन गेले होते. तर समाधान धनगर यास पथकाने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सोबत चला असे सांगितले असता त्याने तुम्ही शुभमला आत्ताचं अटक करा, असे सांगीतले.

    मात्र, आधी तक्रार करा असे पोलिसांनी सांगीतल्याचा राग येवून समाधान पोलिस पथका सोबत न येता त्याच्या दुचाकीवर पोलिस ठाण्यात आला व त्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास वेळीच थांबवले तर या प्रकरणी समाधान याच्या फिर्यादीवरून शुभम पाटील विरूध्द अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समाधानविरूध्द देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ज्याला मारहाण झाली तो तक्रार देण्यास आला नाही. तर शिविगाळ झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात येवून द्यावी लागेल आणि ज्या गुन्ह्यात अटक करण्याचे अधिकार पोलिसांना नाही त्यात अटक करावी. या करीता अंगावर पेट्रोल ओतून धनगर हा पोलिसांना वेढीस धरत आहे, असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे !

    August 25, 2026

    रविवारपासून बेपत्ता भूषणचा सोमवारी मृतदेह; नेव्हरे धरणातील घटनेने खळबळ

    August 25, 2026

    बोरी नदीने घेतला १२ वर्षीय चिमुरड्याचा बळी; पोहायला गेलेल्या दक्षचा बुडून दुर्दैवी अंत

    August 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.