
जळगाव : प्रतिनिधी
कुठलाही परवाना नसतांना वाळूची चोरटी वाहतुक करणारे दोन पिकअप वाहनांवर तालुका पोलिसांनी कानळदा ते विदगाव रस्त्यावर कारवाई केली. दोन वाहने जप्त केली असून ही कारवाई दि. २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजता केली. याप्रकरणी वाहन चालकांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील काळनदा ते विदगाव रस्त्यावरील एमएसईबीच्या सब स्टेशनजवळून विना परवाना वाळूची वाहतुक करणारे (एमच १९, सीएक्स ३८३३) क्रमांकाचे वाहन तालुका पोलिसांनी दि. २२ रोजी मध्यरात्री पकडले. वाहन चालकाकडे परवाना मागितला असता त्याकच्याकडे कुठलाही परवाना नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी वाहन ताब्यात घेत वाहन चालक प्रफुल्ल गुणवंत नेहते (वय ३१, रा. जैनाबाद, मोहन टॉकीजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कानळदा ते विदगावर रस्त्यावरच काही वेळानंतर (एमएच ०६, बीजी ३१५७) क्रमांकाचे वाळू वाहतुक करणारे पिकअप वाहन तालुका पोलिसांनी पकडले. ही कारवाई दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रवीण पाटील हे करीत आहे



