

जळगाव : प्रतिनिधी
दुचाकीने यावलला जात असतांना तोल जावून पडल्यामुळे ज्योती प्रकाश नारखेडे (वय ६२, रा. इंद्रप्रस्थ नगर) हे गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना दि. २२ ऑक्टोंबर रोजी शेळगाव बॅरेजच्या गेटजवळ घडली होती. यातील गंभीर जखमी महिलेचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या ज्योती नारखेडे या दि. २२ रोजी दुचाकीने यावल येथे जात होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव बॅरेजजवळील गेटजवळ दुचाकीवरुन तोल लावून पडल्यामुळे ज्योती नारखेडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांचा दि. २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ राजेश मेंढे हे करीत आहे.



