Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शांतता करारानंतरही दिलासा नाही : सीएनजी-पीएनजी दरवाढीचा दणका !
    क्राईम

    शांतता करारानंतरही दिलासा नाही : सीएनजी-पीएनजी दरवाढीचा दणका !

    editor deskBy editor deskJune 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे :  वृत्तसंस्था 

    इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. होर्मुज खाडीतील तणावामुळे तेल आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरू लागल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या दरात कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत पुणे परिसरातील सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना मात्र दरवाढीचा मोठा धक्का बसला आहे.

    पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाची वाढ करण्यात आली असून नवीन दर 95.75 रुपये प्रति किलो झाला आहे. याशिवाय घरगुती पाईप नॅचरल गॅस (पीएनजी)च्या दरातही 85 पैशांची वाढ करण्यात आली असून आता ग्राहकांना प्रति मानक घनमीटर 51.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

    विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 8 मे रोजी प्रति किलो दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 28 मे रोजी आणखी अडीच रुपयांची वाढ झाली. आता पुन्हा एक रुपयाने दर वाढल्याने वाहनचालकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाच स्थानिक स्तरावर नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किमती कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली असताना सीएनजी आणि पीएनजीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडले आहे.

    महागाईच्या झळा आधीच सहन करणाऱ्या नागरिकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरत आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार असून घरगुती पीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

    दरम्यान, जागतिक बाजारातील घडामोडी आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठा खर्चानुसार पुढील काळात दरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्या तरी ग्राहकांना दिलास्याऐवजी दरवाढीचाच सामना करावा लागत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘ऑपरेशन क्लीन-अप’ : जळगाव शहरात पहाटेपासून पोलिसांचा धडक अॅक्शन

    June 16, 2026

    भरधाव कारने मांडला मृत्यूचा तांडव; एक ठार, पाच जण गंभीर

    June 16, 2026

    पाऊस दडी मारताच वाढली चिंता; अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

    June 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.