Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव कारने मांडला मृत्यूचा तांडव; एक ठार, पाच जण गंभीर
    क्राईम

    भरधाव कारने मांडला मृत्यूचा तांडव; एक ठार, पाच जण गंभीर

    editor deskBy editor deskJune 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा : प्रतिनिधी 

    परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण रस्ते अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने प्रथम समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुटुंबाला उडविल्याने हा थरारक अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज समशेर तडवी (रा. वडगाव, ता. रावेर) हा त्याच्या हुंडाई कार (एमएच ०१ एआर २७०६) मधून सावदा-वाघोदा मार्गावरून भरधाव वेगाने जात होता. वाहन चालविताना त्याचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीवरील चार जणांना कारने जोरदार धडक दिली.

    धडकेनंतरही कारचा वेग कमी न झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कुटुंबावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आत्माराम बाबुराव ढिवरे (वय ५३, रा. मोरगाव बु.) यांचा जागीच मृत्यू झाला.

    अपघातात मृत आत्माराम ढिवरे यांच्या पत्नी, मुलगा तसेच दुचाकीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

    दरम्यान, अपघातानंतर सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले असून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी चालक सरफराज तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाऊस दडी मारताच वाढली चिंता; अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

    June 16, 2026

    मॉर्निंग वॉक ठरला महागात; पत्ता विचारत वृद्धेची दीड लाखांची सोनपोत लंपास

    June 16, 2026

    परवाना मंजुरीसाठी ‘रेटकार्ड’; ३० हजारांची लाच घेताना एसीबीचा सापळा

    June 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.