Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किरकोळ वादातून हाणामारी : जळगावात एकाच खून !
    क्राईम

    किरकोळ वादातून हाणामारी : जळगावात एकाच खून !

    editor deskBy editor deskJune 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    किरकोळ वादातून हाणामारी करीत रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात घालून जीवन शालीक पाथरकर (वय ३८, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. हरिविठ्ठल नगर) यांची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास शामनगर परिसरात उघडकीस आली. सुरुवातीला मयताला अनोळखी म्हणून रुग्णालयात दाखल केले. मात्र नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर घातपाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    शहरातील शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आल्याने नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुशील चौधरी, जितेंद्र राजपुत, अजित पाटील, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंभोरे हे रुग्णालयत दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांचा शोध घेत मयत जीवन पाथरकर यांची ओळख पटविली. यावेळी नातेवाईकांनी मयताच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन त्याच्यासोबत ातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली.

    मयत जीवन शालीक पाथकर हे मुळचे जामनेर तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी असून सुमारे पंधरा वर्षापुर्वी कामा निमीत्त वयोवृद्ध आई सोबत जळगावात राहण्यासाठी आले होते. पत्नीने सोडून दिल्यानंतर त्यांच्या मुलाने देखील लग्न करुन घेतले. त्यामुळे जीवन पाथरकर हे एकटेच असल्याने मिळेल ते काम करुन त्यावर स्वतःचा उदर्निवाह करीत होते.

    जीवन पाथरकर आणि दोघ संशयित हे एका ठिकाणी बसले होते. पाथरकर याने एका वृद्ध व्यक्तीला त्याने आणलेली खिचडी खाण्यासाठी दिली. तसेच ती खिचडी तिसऱ्या व्यक्तीला देवू नको असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्या संशयिताने जीवन पाथरकर यांना मारहाण केली. या मारहाणीत खाली पडलेला दगड उचलून संशयिताने जीवन पाथकर यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

    मामाच्या मृत्युची माहिती कळताच त्यांचा भाचा तुषार राजेंद्र सुतार हा जिल्हा रुग्णालयात पोहचला. पोलिसांनी त्यास मृतदेह दाखवल्यावर त्याने, मयत माझाच मामा असल्याची ओळख पटवली. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या मामांसोबत वाद घालून भांडण करणाऱ्या दोघांवर त्याने संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्या दोघांपैकी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याचा राग; कैद्याने पकडला रक्षकाचा कॉलर

    June 9, 2026

    ड्रग रॅकेट प्रकरणातील आरोपीवर बुलडोझर कारवाई; अनधिकृत दुकाने जमीनदोस्त

    June 9, 2026

    आजीच्या डोळ्यादेखत नातवाचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा अंत

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.