Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाहाटा चौफुलीवर थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
    क्राईम

    नाहाटा चौफुलीवर थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

    editor deskBy editor deskJanuary 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहराजवळील नाहाटा चौफुलीपुढे महामार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेत कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. वांजोळा रोडवरून सिंधी कॉलनीकडे महामार्ग ओलांडत असताना दुचाकीवरून जाणारे तिघे अचानक समोरून येणाऱ्या कंटेनरसमोर आले. अवघ्या काही क्षणांत निर्णय घेत चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कंटेनर समांतर रस्त्यावरील दुभाजकावर चढवला आणि तिघांचे प्राण वाचवले.

    मिळालेल्या माहितीनुसार,  छत्तीसगडहून जळगावकडे जाणारा कंटेनर नाहाटा चौफुलीच्या उड्डाणपुलावरून उतरत असताना हा प्रसंग घडला. दुचाकी अचानक समोर आल्याने धडकेत भीषण अपघात होण्याची शक्यता होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर वळवला. काही सेकंद उशीर झाला असता तर अनेकांचा जीव गेला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

    या धडकेत कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नाहाटा चौफुली ही अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. याठिकाणी अनेक अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वारंवार दुर्घटना होऊनही महामार्ग प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने संताप व्यक्त होत आहे. घटनेनंतर माजी आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि नगरसेवकांनी घटनास्थळी भेट दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.