Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया
    Uncategorized

    शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 20, 2021Updated:August 20, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    पोलिसात गुन्हा दाखल, माजी महापौरांच्या हस्ते पुतळा दहन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    पोलिसात गुन्हा दाखल, माजी महापौरांच्या हस्ते पुतळा दहन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    जळगाव, दि.२० – देशातील प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तुलना तालिबान्यांशी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जळगावात याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनीपेठ पोलीस ठाण्यात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला असून सायंकाळी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पुतळा दहन करण्यात आला. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.

    शायर मूनव्वर राणा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांना दरोडेखोर संबोधत त्यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. तसेच ‘आपके लोग किसी को भी भगवान बना देते है’ असे म्हणून त्यांनी समस्त हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. आजवर ज्या देशवासीयांनी मुनव्वर राणा यांना डोक्यावर घेतले तेच राणा आता हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिकता आणि एकात्मता भंग होण्याची शक्यता आहे. मुनव्वर राणा यांचा जळगावात निषेध करण्यात आला असून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

    शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल
    मूनव्वर राणा यांच्या विरुद्ध नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनीपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात दाद मागण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

    माजी महापौरांच्या हस्ते पुतळा दहन


    जळगाव शहरातील महर्षी वाल्मिक चौकात वाल्मिक लव्य सेना आणि महर्षी वाल्मिक बहुउद्देशीय मंडळातर्फे मूनव्वर राणा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. माजी महापौर भारती सोनवणे यांनी पुतळा दहन केला. यावेळी राणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

    जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
    शायर मूनव्वर राणा यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. शायर मूनव्वर राणा यांनी ‘आप लोग किसी को भी भगवान बना लेते हैं’ असे वक्तव्य करीत केले आहे. मूनव्वर खान यांनी आजवरच्या हिंदू धर्मियांच्या भावना आणि परंपरागत मान्यतेवर टीका केली आहे. हिंदू धर्मियांचा हा अपमान असून देवी, देवतांच्या अस्तित्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मूनव्वर खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र, पालकमंत्री जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठविण्यात आली आहे.

    यावेळी उपस्थिती मूनव्वर राणा यांच्याविरुद्ध तक्रार देताना आणि इतर प्रसंगी माजी महापौर भारती सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर बाविस्कर, दत्तात्रय कोळी, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे मोहन शंखपाळ, भरत सपकाळे, निलेश तायडे, रोहिदास ठाकरे, कमलेश सपकाळे, भैय्या पाटील, किशोर सोनवणे, ललित सोनार, युगल सोनार, विष्णू ठाकरे, मनोज रायसिंगे आदींसह इतर संतप्त नागरिक उपस्थित होते.

        Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
        टीम लाईव्ह महाराष्ट्र
        • Website

        Related Posts

        प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

        March 5, 2026

        समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

        February 18, 2026

        प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

        January 21, 2026
        Leave A Reply Cancel Reply

        Facebook X (Twitter) Instagram Pinterest
        © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

        Type above and press Enter to search. Press Esc to cancel.