Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : सोशल मिडीयावर झाली ओळख : तरुणीला जळगावात बोलवून केला अत्याचार !
    क्राईम

    खळबळजनक : सोशल मिडीयावर झाली ओळख : तरुणीला जळगावात बोलवून केला अत्याचार !

    editor deskBy editor deskJuly 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तिला जळगावात बोलवून नेरीच्या तरुणाने एका खोलीमध्ये तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संशयित अमोल राठोड (रा.नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शिरपूर येथील एका तरुणीची अमोल राठोड या तरुणासोबत सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांचे नियमित मोबाइलवर बोलणे सुरू होते. १० जुलै रोजी, सकाळी अमोल राठोड याने तरुणीला जळगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलविले. मी शाळेत जात असल्याचे आईला सांगून ही तरुणी जळगावात आली. यावेळी हा तरुण हा मित्रासोबत तिला भेटण्यासाठी आला. नंतर तो तरुणीला मित्राच्या घरी घेऊन गेला. मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले असता, अमोल हा तरुणीशी जबरदस्ती करू लागला. मात्र, तरुणीने त्यास नकार दिला. त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो तिला भाड्याने घेतलेल्या खोलीवर घेऊन गेला. तेथे तरुणीवर त्याने अत्याचार केला. त्यानंतर, तरुणीला मित्राच्या घरी सोडून तो तेथून निघून गेला. तरुणीने तिच्या मैत्रिणीला कळविले. तरुणीचे नातेवाईक हे जळगावात आले व तिला शिरपूर येथे घेऊन गेले. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनि. संजय तडवी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.