जळगाव ;- सुप्रीम कंम्पनीजवळ असलेल्या शेतामधून अज्ञात चोरटयांनी पीव्हीसी पाईप लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जफरोद्दिन रहिमोद्दिन पिरजादे (वय ७६, रा. जुना मेहरूण पिरजादेवाडा जळगाव) हे शेतकरी असून सुप्रिम कंपनीच्या जवळच त्यांची शेती आहे. १७ ऑगस्ट सकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या २५ हजार रूपये किंमतीचे २० फुट लांबीचे ३५ पिव्हीसी पाईप आणि ५ हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.