Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रुग्णवाहिका लावण्यावरून वाद पेटला : तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; हाताला गंभीर दुखापत!
    क्राईम

    रुग्णवाहिका लावण्यावरून वाद पेटला : तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; हाताला गंभीर दुखापत!

    editor deskBy editor deskNovember 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    रुग्णवाहिका लावण्यावरून वाद होऊन रवी जयकारे (वय २२, रा. अजिंठा हौसिंग सोसायटी) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी शहरातील अजिंठा चौफुली परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    प्राथमिक माहितीनुसार,  शहरातील अजिंठा चौफुली परिसरात आयोध्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे रुग्णवाहिका लावलेली होती. त्यावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला. त्यात रवी जयकारे या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत असताना त्याने हाताने तो रोखला. त्या वेळी त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यास खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

    November 10, 2026

    फुलगाव गोळीबार प्रकरणाला हत्येचे वळण : आठ दिवसांच्या उपचारानंतर सरफराजची प्राणज्योत मालवली!

    November 10, 2026

    राज्यातील प्रसिद्ध देवस्थाने दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडाला धमकीचा ई-मेल!

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.