Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावीच्या निकालाची महत्वाची अपडेट !
    क्राईम

    विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावीच्या निकालाची महत्वाची अपडेट !

    editor deskBy editor deskMay 12, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे: वृत्तसंस्था

    राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागलेले आहेत. दहावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार असून, 13 ते 15 मेदरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

    राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच बारावीचा निकाल जाहीर करण्याची किमया साधली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीच्या निकालाच्या पत्रकार परिषदेतच दहावीचा निकाल यंदा 15 मेपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी राज्य मंडळाकडे आता अवघे तीन दिवस उरल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

    राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी निकालाच्या सद्य:स्थितीबद्दल माहिती देताना सांगितले की, दहावीच्या निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. निकालाच्या कामकाजाचा आढावा सोमवारी किंवा मंगळवारी घेण्यात येणार असून, निकाल कधी जाहीर करायचा, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून दहावीच्या निकालाच्या विविध तारखा जाहीर करण्यात येत आहेत. परंतु, राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्याचे प्रकटन देण्यात येते. त्यातील माहितीवरच विश्वास ठेवावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच, निकाल 15 मेपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.