Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपडा : २५ वर्षीय नराधमाने केला ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार !
    क्राईम

    चोपडा : २५ वर्षीय नराधमाने केला ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskApril 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    शहरातील एका भागात पाच वर्षीय बालिकेवर २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात असलेल्या शिवारात एक परिवार सालदरकीचे काम करतो. परिवारातील पाच वर्षीय बालिका दुपारी ३ वाजेच्या सुमारास खेळत असताना आरोपी नियाल किरदार वास्कले (२५, पिलाऱ्या, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याने मुलीस खाऊच्या बहाण्याने जवळ असणाऱ्या झोपडीत नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.  ही घटना परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. पिडीत मुलीचे आई-वडील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात जमलेल्या जमावाने आरोपीस चोप दिला. घटनास्थळी पोलिस पोहोचले.

    पोलिसांनी आरोपी आणि पिडीत मुलगी यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील व अन्य डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली. आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने बोलण्याचा मनस्थितीत नव्हता. डॉ. चंद्रकांत बारेला यांनी पोलिस प्रशासनास मदत केली. उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक मधुकर सावळे, पोलिस उप निरीक्षक जितेंद्र वलटे, भुसारे आदींनी बंदोबस्त राखला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026

    यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    October 28, 2026

    वृद्ध महिलेच्या मालमत्तेची परस्पर नोंदणी? मेहरुणमधील जागा प्रकरणी पाच जण अडचणीत

    October 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.