जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील रवंजा बु” येथील एका विद्यालयात दिनांक ११ मार्च रोजी या शाळेतील शिक्षक मंगेश पाटील याने इयत्ता ९वीतील एका विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.या संदर्भात एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली याची चाहूल लागल्याने संशयित आरोपी शिक्षक मंगेश पाटील हा ११मार्च पासुन फरार होता.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या सुचनेनुसार L.C.B चे लक्ष्मण पाटील (हवालदार), जितेंद्र पाटील (हवालदार) भुषण पाटील (पो.कॉ.)एरंडोल पोलिस स्टेशनचे महेंद्रसिगं पाटील (हवालदार)व राजेश पाटील (हवालदार)या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक मोबाईलच्या लोकेशन वरुन संभाजी नगर येथे रवाना झाले व त्यांनी काल दुपारी १:३०च्या सुमारास शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना करणाऱ्या मंगेश पाटील या शिक्षकाला ताब्यात घेऊन रात्री एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये हजर केले असुन त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.