Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह आईने मारली विहिरीत उडी
    क्राईम

    खळबळजनक : दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह आईने मारली विहिरीत उडी

    editor deskBy editor deskMarch 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था

    तालुक्यातील वांगी येथे दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह अाईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गावातील शेतात घडला. त्यापैकी सहा तास शोधानंतर दोघांचे मृतदेह सापडले. एका मुलाचा शोध सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणले. चित्रा कविराज ऊर्फ दत्तात्रय हाके (२८) आणि स्वराज कविराज हाके (२) यांचा मृतदेह सापडला. पृथ्वीराज कविराज हाके (५) याचा शोध सुरू आहे. एक मुलगा गतिमंद व दुसऱ्यास ऐकू कमी येत असल्याच्या तणावातून चित्रा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

    चित्रा या पतीसह शेती करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी. मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतिमंद होता. त्याच्या उपचारावर मोठा खर्च झाला. दुसरा मुलगा स्वराज यास ऐकू कमी येत होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. यामुळे चित्रा या मानसिक तणावात होत्या. मलाच अशी मुले का? असे त्या वारंवार म्हणत, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. चित्रा यांनी दोन मुलासह शेतातील ५० ते ६० फूट विहिरीत उडी घेतल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज याचा मृतदेह तरंगत असल्याने तो काढण्यात आला. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. चित्रा यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी सहा वाजता बाहेर काढला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; एनए परवानगीसाठी स्वतंत्र प्रक्रिया संपुष्टात

    February 12, 2026

    पाचोऱ्यातील महिलेची ८.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

    February 12, 2026

    धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला

    February 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.