• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !

editor desk by editor desk
February 14, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यातील अनेक ठिकाणच्या दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेवून ताकद वाढविण्याचे काम सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील इनकमिंग सुरूच आहे. त्यातच आता काँग्रेससह इतर पक्षांनाह बरीच गळती लागल्याचे दिसत आहे.

गोंदिया जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्याच्या वाटेवर असून काँग्रेससग इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या काँग्रेस सह इतर पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली असून अनेक दिग्गज नेते हे विविध पक्षांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच अर्जुनी मोरगाव विधानसभेचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मुंबई येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजेच तिसऱ्या आघाडीकडून सुगत चंद्रिकापुरे यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेची वाट धरली.

एवढंच नव्हे तर आता आमगाव देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना गटामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 20 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार आहे. शिवसेनेतील इनकमिंग गेल्या काही महिन्यात वाढलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक दिग्गज नेतासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवार गटातील नेताही शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याने महायुतीमध्ये कुरबूरी वाढण्याती शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत काँग्रेससह इतर पक्षांनाही गळती लागली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना पक्ष मजबूत होण्याच्या मार्गावर आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला कोण कोण प्रवेश करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

 

Previous Post

भावाने मारला बहिणीच्या घरात डल्ला : पोलिसांनी केली अटक

Next Post

अर्जुन खोतकर बरसले : उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे लोक सांभाळता आले नाही !

Next Post
अर्जुन खोतकर बरसले : उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे लोक सांभाळता आले नाही !

अर्जुन खोतकर बरसले : उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे लोक सांभाळता आले नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चुकून पाकिस्तानात गेलेला जवान भारतात परतला !
क्राईम

चुकून पाकिस्तानात गेलेला जवान भारतात परतला !

May 14, 2025
पाकिस्ताननंतर चीनच्या कुरापती सुरूच !
क्राईम

पाकिस्ताननंतर चीनच्या कुरापती सुरूच !

May 14, 2025
आईने ‘शाळेत जा’ म्हटल्याने संतापलेल्या नववीतील मुलाने घेतला गळफास
क्राईम

धरणगावात प्रौढाने आयुष्य संपविले !

May 14, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

आठ दिवसावर लग्न अन भावी नवरदेवाने घेतला टोकाचा निर्णय !

May 14, 2025
देणगीदारांना शिर्डीत साई संस्थानच्या नव्या सेवा-सुविधा…
राजकारण

देणगीदारांना शिर्डीत साई संस्थानच्या नव्या सेवा-सुविधा…

May 14, 2025
सरकारचे शाळांना महत्वाचे आदेश : सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आणि तक्रार पेटी !
राजकारण

सरकारचे शाळांना महत्वाचे आदेश : सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आणि तक्रार पेटी !

May 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group