Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खाकी वर्दीपलीकडची माणुसकी : पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित चिमुकल्यांची आनंदाची दिवाळी !
    क्राईम

    खाकी वर्दीपलीकडची माणुसकी : पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित चिमुकल्यांची आनंदाची दिवाळी !

    editor deskBy editor deskNovember 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण! मात्र समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत या सणाचा आनंद पोहोचतोच असे नाही. अशा परिस्थितीत समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी एक संवेदनशील आणि स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सानिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या व कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील चिमुकल्यांना दिवाळीचा आनंद अनुभवता आला.

    या उपक्रमांतर्गत वंचित कुटुंबांतील लहान मुलांना पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी स्नेहपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मुलांशी संवाद साधत त्यांच्या जीवनातील विविध पैलू जाणून घेतले. मुलांचे शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती, दैनंदिन जीवनातील अडचणी तसेच भविष्यातील स्वप्ने याबाबत त्यांनी आस्थेने विचारपूस केली.

    केवळ औपचारिक भेट न ठेवता या चिमुकल्यांना आपलेपणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. अनपेक्षितपणे मिळालेल्या या भेटींमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या निरागस हास्याने संपूर्ण वातावरणात आनंद आणि आपुलकीचे भाव निर्माण झाले.

    समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांनाही इतर मुलांप्रमाणे आनंदाने सण साजरा करता यावा, त्यांना प्रेम, सन्मान आणि प्रोत्साहन मिळावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

    विशेष म्हणजे, या उपक्रमातून केवळ कपडे, शूज किंवा मिठाईचे वाटप करण्यात आले नाही, तर वंचित मुलांच्या भावविश्वाला समजून घेण्याचा आणि त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

    मदतीचा हात देताना माणुसकीची नाळ जपली, तर एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करता येतात, याची प्रचिती या उपक्रमातून आली. सानिका धिवरे आणि अर्णव धिवरे यांच्या पुढाकारातून घडलेला हा उपक्रम समाजातील इतरांनीही प्रेरणा घेण्यासारखा असून, खऱ्या अर्थाने माणुसकीचा प्रकाश पसरविणारी ही दिवाळी ठरली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात गांजाची हिरवीगार शेती : चोपडा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ४.६७ कोटींचा मुद्देमाल जप्त !

    November 12, 2026

    जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    November 11, 2026

    जावयाचा मृत्यू सहन झाला नाही : अंत्यविधी सुरू असतानाच सासूनेही घेतला अखेरचा श्वास; जळगावात हळहळ!

    November 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.