• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात रॅलीला भरभरून प्रतिसाद

editor desk by editor desk
November 16, 2024
in राजकारण, राज्य
0
मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी गेल्या १० वर्षाच्या काळात नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे अनेक बदल घडून आले. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी यांनी प्रचार रॅलीदरम्यान संवाद साधताना केले. जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे यांनी राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात रॅली काढली. प्रसंगी जनतेतून भरभरून प्रतिसाद लाभला.

राजर्षी शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथे पूजा करून आ. भोळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून शाहू नगर परिसर, कोर्ट चौक मार्गे जयकिसनवाडी, नेहरू चौक, व. वा. वाचनालयमार्गे जिल्हा परिषद परिसरातून चित्रा चौक, नवी पेठेतील कंवरलाल संघवी यांचे घरी समारोप करण्यात आला. मार्गात अनेक तरुणींनी लोकप्रिय उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, रॅलीच्या रस्त्यावर डॉ. आरती हुजुरबाजार, नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, दिलीप गांधी, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे मंडळ अध्यक्ष मनोज काळे, विजय वाडकर, राजू खेडकर, प्रीतम पवार, अजय गांधी, जगदीश जोशी, किशोर देशमुख, प्रमोद वाणी, अमित देशपांडे, महेंद्र गांधी, अजय जैन, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शंतनू नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, कौसर काकर, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

आश्वासनांनी भुलविणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करा – एकनाथराव खडसे

Next Post

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

Next Post
चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

चिमुरडीचे अनोखे प्रेम : "विजयी भव" ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा – विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group