भुसावळ : प्रतिनिधी
चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटले असल्याचा प्रकार निंभोरा खुर्द, ता. भुसावळ येथे घडला. या प्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फरिदा रशिद पिंजारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. १० रोजी रात्री १:३० वाजता तीन जण त्यांच्याकडे आले. त्यांनी त्यांच्या साईटवरील चोरीचा माल भंगारात विकत घेतल्याचा बहाण केला. त्यानंतर पिंजारी यांच्या वडिलांना चाकूचा धाक दाखवल आणि तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दुकानात असलेले एक लाख रुपये घेऊन त्यांनी पोबारा केला या प्रकरणी दि. १४ रोजी फिर्याव देण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश दराडे करत आहेत.