• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

भादली-कडगाव-शेळगाव परिसरात प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत

editor desk by editor desk
November 12, 2024
in राजकारण, राज्य
0
जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली-कडगाव-शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. जळगाव ग्रामीणच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा दिली.

गुलाबराव देवकर यांनी भादली, शेळगाव, कडगाव, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे, कानसवाडे आदी गावांना प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. महिला, शेतकरी व बेरोजगारांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीने सादर केलेल्या जाहीरनाम्यातील पंचसूत्रीची माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, पं.स.चे माजी उपसभापती विजय नारखेडे, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, शेळगावचे माजी सरपंच हरीष कोळी, रामा कोळी, निवृत्ती कोळी, कानसवाडे येथील सरपंच संजय कोळी, माजी उपसरंपच सुकदेव कोळी, भोलाणेचे सरपंच नितीन सपकाळे, कडगाव येथील मुरलीधर कोळी, पंढरीनाथ कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेळगाव बॅरेजचे पाणी शेतीशिवारात खेळविणार

जळगावहून शेळगावमार्गे यावल जाण्यासाठी दोन्ही बाजुने राज्यमार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, तापी नदीच्या पात्रात शेळगाव बॅरेजच्या खाली दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. सेवेची संधी मिळाल्यानंतर सदर पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. तसेच शेळगाव बॅरेजचे पाणी जळगाव तालुक्यातील शेतीशिवारात खेळविण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील. जेणेकरून कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन त्यांचे जीवनमान सुधारेल, असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले

Previous Post

“गुलाब भू च मंत्री होणार !” – सर्व सामन्यांच्या भावना

Next Post

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

Next Post
प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group