भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील द्वारका नगरात भरदुपारी संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वर्षा अक्षय गुंजाळ (२४) असे मयताचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी आणि महिलेचा पती अक्षय गुंजाळ याला मनमाड येथून ताब्यात घेतले. त्याला भुसावळ न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त शहरात लगबग सुरू असताना व सर्व दिवाळीची तयारी करत असताना शहरातील द्वारका नगर सात नंबर पोलिस चौकीच्या मागे येथे खुनाची घटना घडली. २४ वर्षीय विवाहिता वर्षा अक्षय गुंजाळ रा. उल्हासनगर, ह. मु. द्वारका नगर, भुसावळ हिचा पतीसोबत वाद झाला. त्यानंतर अक्षय याने वर्षा हिला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात वर्षा जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाळे, उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला तसेच ज्या रॉडने वार करण्यात आले होते ते ताब्यात घेतले. दरम्यान, घटना घडल्यानंतर संशयित आरोपी अक्षय गुंजाळ हा फरार झाला. त्यास मनमाड आरपीएफ यांच्या सहकार्याने मनमाड रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले. फरार आरोपीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल सुरवाडे, इकबाल सय्यद दीपक शेवरे, भूषण चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यात मुख्यालय पोलिसा निरीक्षक आर. के. सिंग यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, आरोपीस भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.