Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर : दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात !
    राजकारण

    कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर : दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात !

    editor deskBy editor deskOctober 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात महायुतीनंतर महाविकास आघाडीतील ठाकरे व पवार गटाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता कॉंग्रेस यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष म्हणजे महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली, महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.

    यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी येण्यास विलंब झाला. अजूनही अनेक जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

    अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर काँग्रेसकडून देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे, अक्कलकोट मधून सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव नगर परिषदेत विनय (पप्पू )भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    January 13, 2026

    राजकारण नव्हे, समाजकारण! प्रभाग क्र. १६ मध्ये विकासासाठी सज्ज इच्छा दीपक अत्तरदे

    January 11, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना वाढता प्रतिसाद

    January 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.