Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन
    जळगाव

    ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

    editor deskBy editor deskOctober 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि. १९ व २० ऑक्टोबर असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडेमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF अॅडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

    उद्घाटनप्रसंगी अशोक जैन म्हणाले की, अशा प्रकारच्या सेमीनारचे बुद्धिबळाच्या विकासासाठी, सक्षम व कुशल आरबीटर व कोचेस साठीचे महत्त्व विषद केले. चेस इन स्कूलचे महत्त्व विषद करून आरबीटर व कोचे यांनी सेमीनारचा फायदा घ्यावा व या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे अपडेट करावे असा मोलाचा सल्ला दिला.

    चिफ फॅकल्टी इंटरनॅशनल आरबीटर वसंत बी. एच. व आय.ए. नितीन शेणवी, पुणे यांचे स्वागत आय.ए. प्रवीण ठाकरे व आकाश धनगर यांनी केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल इ. विविध राज्यांमधून एकुण ८० चेस आरबीटर व कोचेस यात सहभागी झालेले आहेत. जळगावमधून नथू सोमवंशी, भरत आमले व आकाश धनगर यांनी सहभाग नोंदवला. या सेमीनारसाठी जैन इरिगेशन प्रायोजकत्व लाभले.सचीव नंदलाल गादिया यांनी सूत्रसंचलन केले व सर्वांचे आभार मानले. भारतात तरुण व उद्योन्मुख खेळाडूंच्या आशादायी कामगोरी मुळे होणाऱ्या बुद्धीबळ या खेळाचा झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अशा प्रकारच्या सेमीनारचा आवश्यकता आहे.

    बुद्धीबळ आरबीटरची क्षमता व कौशल्य वाढवणे, सुक्ष्म नियमांची माहीती देणे, तांत्रिक कौशल्य सुधारणे, टुर्नामेंटचे स्टॅंडर्डायझेशन (मानकीकरण) करणे, सहयोग वाढवणे, भविष्यातील नेते विकसीत करणे, बुद्धीबळ Ecosystem (परिसंस्था) वाढवणे, एकूण बुद्धीबळ पायाभूत सुविधा मजबूत करणे इत्यादी उद्दीष्ट या सेमीनारने साधले जातील सेमीनारच्या यशस्वीतेसाठी रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.