Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्यात ‘तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात ‘तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 12, 2026Updated:August 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शासकीय कार्यालये, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचे आरोप; ओळखपत्राचा धाक दाखवून वसुली सुरू असल्याची चर्चा

    जळगाव (विशेष प्रतिनिधी) — जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कथित ‘तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा आहे. पत्रकारितेच्या नावाखाली शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच विविध व्यावसायिकांना ओळखपत्राचा धाक दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत. या प्रकारांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पत्रकारितेचा किंवा प्रसिद्धीचा दबाव आणत असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वनविभाग यांसह विविध ठिकाणी अशा व्यक्तींचा वावर असल्याचे सांगितले जात आहे.

    काही ठिकाणी किरकोळ रकमेपासून ते हजारो रुपयांपर्यंत पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.

    शासकीय कार्यालयांपुरतेच हे प्रकार मर्यादित नसून, व्यापारी, उद्योजक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल-ढाबा व्यावसायिक आणि इतर व्यावसायिकांवरही पत्रकार असल्याचे सांगून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत पत्रकारांच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

    दरम्यान, केवळ ओळखपत्र असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला पत्रकार म्हणून अधिकृत मान्यता मिळतेच असे नाही. त्यामुळे पत्रकारितेच्या नावाखाली कोणी धमकी, दबाव किंवा पैशांची मागणी करत असल्यास संबंधितांनी पुरावे जतन करून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    या पार्श्वभूमीवर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून जोर धरत आहे.

    पत्रकारितेच्या नावाखाली वसुली करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास खऱ्या पत्रकारितेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मेहरूण तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडवर; १६ ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढणार

    August 12, 2026

    जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

    August 12, 2026

    धरणगाव येथे १४ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.