एरंडोल : प्रतिनिधी
शहरातील विद्यानगरातील डॉ. धीरज ऊर्फ राहुल मराठे हे घराला कुलूप लावून पारोळा येथे परिवारासह रथोत्सव पाहण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यानी घराच्या लाकडी व लोखंडी दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे पन्नास हजार रुपये रोकड व देवाच्या चांदीच्या मूर्ती लंपास केल्या.
ही घटना मंगळवारी रात्री घडली. बुधवारी सकाळी त्यांच्या घरासमोरील रहिवाशांच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याबाबत डॉ. मराठे यांना कळविले. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
डॉ. राहुल ऊर्फ धीरज मराठे हे पारोळा येथे परिवारासह रथोत्सव पाहण्यासाठी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराच्या लोखंडी व लाकडी अशा दोन्हीं दरवाजांना लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच कपाट उघडून ५० ते ६० हजार रुपये रोकड व ३० ते ३५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मूर्ती लंपास केल्या. बुधवारी सकाळी त्यांच्या घरासमोर राहत असलेल्या रमेश पाटील यांच्या लक्षातचोरीचा प्रकार आला. त्यांनी मराठे यांना याबाबत माहिती दिली.