• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन ; फडणवीस !

editor desk by editor desk
October 9, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन ; फडणवीस !

नागपूर : वृत्तसंस्था

देशातील हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. निकालाआधी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. हरियाणातील निकालानंतर ठाकरे गटाकडून काँग्रेसवर टीका होत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे आता हम आपके है कौन असे म्हणत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपावर देखील भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गट काल निवडणूक निकालामुळे भाजपला घेरण्याची संधी पाहत होते. हरियाणामध्ये भाजप कधी हरतो आणि आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो याच तयारीत ते होते. परंतु, त्यांना संधी मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन, असे म्हणत आहेत, अशी टोला फडणवीस यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी तयार केलेला फेक नरेटिव्ह हरियाणा विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत देखील माहिती दिली. महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. आमचा जागावाटपाचा 80 टक्के पेपर सोडवला आहे. आता 20 टक्के पेपर बाकी असून तो देखील लवकरच सोडवणार आहोत. तो सोडवल्यावर त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Previous Post

आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा,

Next Post

अजित पवारांना बसणार मोठा धक्का : निंबाळकरही हातात घेणार तुतारी

Next Post
अजित पवारांना बसणार मोठा धक्का : निंबाळकरही हातात घेणार तुतारी

अजित पवारांना बसणार मोठा धक्का : निंबाळकरही हातात घेणार तुतारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना :  मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !
क्राईम

मोठी दुर्घटना : मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !

July 13, 2025
मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !
क्राईम

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !

July 13, 2025
भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !

July 13, 2025
अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
क्राईम

अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

July 13, 2025
विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !
क्राईम

विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

July 13, 2025
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश
जळगाव

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group