जळगाव : प्रतिनिधी
वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकींसह रवींद्र उर्फ राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांनी जळगाव जिल्ह्यासह पुणे व मुंबई येथूनही दुचाकी चोरलेल्या असून त्या चार दुचाकींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना दिल्या. त्यांनी तयार केलेल्या पथकाला रवींद्र पाटील व दीपक पाटील हे दुचाकी चोरी करून वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन सहा दुचाकी हस्तगत केल्या.
ही कारवाई पोउनि राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजित जाधव, दीपक चौधरी यांनी केली.